Rawalpindi Stadium : PSL सामन्यापूर्वी ड्रोन हल्ल्याने खळबळ; परदेशी खेळाडू घरवापसीच्या तयारीत

India-Pakistan Tensions Escalate After Drone Attack Near Rawalpindi Stadium : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. काल भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. ज्यामध्ये पाकिस्तानचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर आता रावळपिंडी स्टेडियमभोवती ड्रोन हल्ला झाला आहे. हा हल्ला क्रिकेट स्टेडियमजवळ झाला. आज रात्री या स्टेडियमवर पीएसलचा सामना खेळवला जाणार होता. रावळपिंडीतील या ड्रोन हल्ल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामुळे स्टेडियमला लागून असलेल्या एका रेस्टॉरंटच्या इमारतीचे अंशतः नुकसान झाले आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी परिसराला वेढा घातला आहे आणि ड्रोन शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पीडितांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, हा ड्रोन भारताचा असल्याचा दावा केला जात आहे.
An Indian drone has hit Rawalpindi Cricket Stadium. The stadium is hosting the PSL tournament, where Peshawar and Karachi will be playing tonight at 8:00 PM. pic.twitter.com/MNwoh1kwbl
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) May 8, 2025
पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यात होणार होता सामना –
कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यातील सामना आज ८ मे रोजी रावळपिंडी स्टेडियमवर होणार होता. कराची किंग्जचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नरकडे आहे. पेशावरचे नेतृत्व बाबर आझम करत आहे. पण या सामन्यापूर्वी स्टेडियमवर ड्रोन हल्ला झाला आणि स्टेडियम उद्ध्वस्त झाले. पण, हा सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला आहे.
हेही वाचा – ऑपरेशन सिंदूरनंतर PBKS vs MI सामन्याचे ठिकाण अचानक बदलले, काय आहे कारण?
परदेशी खेळाडू पाकिस्तान सोडून जाऊ इच्छितात –
काही परदेशी खेळाडू पाकिस्तान सोडू इच्छितात अशा बातम्या आहेत. मुलतान सुल्तान्सचे डेव्हिड विली आणि ख्रिस जॉर्डन यांनी त्यांच्या फ्रँचायझीला सांगितले आहे की त्यांना आता घरी परतायचे आहे. मुलतान सुल्तान्स संघ आधीच प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन खेळाडूंच्या संपर्कात आहेत. त्यांनी अद्याप खेळाडूंना पाकिस्तान सोडण्याचे निर्देश दिलेले नाहीत, परंतु यूके सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.





