पिंपरी कॅम्पमधील तीन दुकानांना आग

Updated On:

पिंपरी : पिंपरी कॅम्पमध्ये कपड्याच्या दुकानाला आग लागली आहे. आग एका दुकानातून इतर दुकानांमध्ये पसरल्यामुळे कपडे, ऑप्टिकल्स आणि मेन्स पार्लर अशी तीन दुकाने जळून खाक झाली आहे . ही घटना मंगळवारी (दि. 28) दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी कॅम्प येथील शगुन चौक ते साई चौक दरम्यान घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बाराच्या सुमारास मुख्य अग्निशमन केंद्राला पिंपरी पोलीस चौकीतून शगुन चौकात आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्राचे तीन, रहाटणी आणि प्राधिकरण उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. उप अग्निशामक अधिकारी ऋषिकांत चिपाडे, अशोक कानडे, लिडिंग फायरमन संजय ठाकूर, प्रतीक कांबळे, फायरमन विजय घुगे, संभाजी दराडे, निखिल गोगवले, सारंग मंगरूळकर, विकास भोंगाळे, अंकुश बडे, भाईदास, सचिन माने, हनुमंत होले, वाहन चालक गोविंद सरोदे, विशाल फडतरे, नीळकंठ दुबे, राजाराम लांडगे, संतोष सरोटे यांच्यासह एकूण 30 जवान घटनास्थळी दाखल झाले.

न्यू हरिष किड्‌स अँड मेन्स वेअर रेडिमेड कपडे, राम ऑप्टिकल्स, पियुष मेन्स वेअर ही तीन दुकाने आगीत जळाली आहेत. जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवल्याने आग आटोक्‍यात येऊन पुढील अनर्थ टळला आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसान याबाबत माहिती मिळू शकली नाही. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आणखी संबंधित बातम्या

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

2026-10-06 13:40:59

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

2026-09-24 15:39:58

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

2026-09-20 21:16:01

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

2026-09-10 22:42:41

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक

2026-09-09 19:25:36

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक