गायक शान राहत असलेल्या इमारतीला आग; अखेर पोस्ट शेअर करत म्हणाला…

Singer Shaan Home Fire | बॉलीवूड गायक शान राहत असलेल्या मुंबईतील इमारतीला आग लागली. पहाटे एक वाजेदरम्यान लागलेल्या आगीमुळे इमारतीतून अचानक धूर येऊ लागला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.
मंगळवारी पहाटे वांद्रे पश्चिम परिसरात असणाऱ्या या फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली होती. याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक शान वास्तव्यास आहे.
सुदैवाने ही आग विझवण्यात आली असून या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र एका 80 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शानच्या इमारतीला आग लागल्याचे वृत्त समजताच त्याचे चाहते चिंता व्यक्त करत होते. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर शानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तो आणि त्याचे कुटूंब सुरक्षित असल्याची माहिती चाहत्यांना दिली.
गायक शानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक नोट शेअर करत लिहिले की, “प्रिय मित्रांनो, आमच्या इमारतीत आग लागल्याची बातमी पसरत आहेत पण मी आणि माझे कुटुंब सुरक्षित आहोत, आग ७ व्या मजल्यावर होती. आम्ही त्याच्या वरच्या मजल्यावर राहतो. त्यामुळे आम्ही १५ व्या मजल्यावर पळून जाण्यात यशस्वी झालो आणि बचाव होण्याची वाट पाहत होतो.आम्हाला सुरक्षित राहण्यास मदत अग्निशमन विभाग, मुंबई पोलिस आभार मानतो. त्यांनी जलद आणि वेळेवर कारवाई केल्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत.” Singer Shaan Home Fire |
शानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक शान आहे. त्यांच्या गाण्यांना तरुण वर्गाकडून मोठी पसंती मिळते. त्याने दोन दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये कॉन्सर्ट आयोजित केला होता. Singer Shaan Home Fire |
हेही वाचा:
“मी जेव्हा लायक वाटेल तेव्हा पक्ष…” ; आणखी एका नाराज भाजप आमदाराने बोलून दाखवली खदखद


