गडकरींच्या वाहन क्रमांकावर बनावट प्रदूषण प्रमाणपत्र; एफआयआर दाखल 

पुणे: देशात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या वाहन क्रमांकावर बनावट प्रदूषण प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणात डेक्कन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देणार्‍या एजन्सीविरूद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशातील अनेक प्रमाणपत्र संस्था वाहने पाहिल्याशिवाय किंवा त्यांची तपासणी न करता प्रदूषण प्रमाणपत्र देत असल्याच्या अहवालानंतर एफआयआरची कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देणाऱ्या एजन्सीने केंद्रीय मंत्र्याच्या वाहनांच्या क्रमांकावर बनावट प्रदूषण प्रमाणपत्र दिले आहे. आरोपानुसार, ज्या वाहनाचे प्रमाणपत्र एजन्सीने दिले आहे. ते दिल्लीत वापरलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.