Yuzhi-Dhanashree’s Divorce : अखेर ! युझी-धनश्रीचा झाला घटस्फोट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. मागच्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. वांद्रे फॅमिली कोर्टाने गुरुवारी त्यांचा घटस्फोट मंजूर केला. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी चहल आणि धनश्री यांना 45 मिनिटे समुपदेशनासाठी वेळ दिला. मात्र, दोघांनीही परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
18 महिन्यांपासून राहत होते वेगळे
चहल आणि धनश्री यांनी न्यायालयाला सांगितले की ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगवेगळे राहत आहेत. जेव्हा दोघांना घटस्फोटाचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांचे एकमेकांशी पटत नाहीये आणि त्यांच्यात सुसंगततेचे प्रश्न आहेत. चर्चेनंतर, न्यायाधीशांनी दोघांनाही अधिकृतपणे घटस्फोट मंजूर केला. न्यायाधीशांनी दोघांनाही कायदेशीररित्या पती-पत्नीच्या नात्यातून मुक्त केले. यानंतर दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.
युझी चहलची पोस्ट
“देवाने मला मोजता येत नाही इतक्या वेळा वाचवले आहे. त्यामुळे मी किती वेळा वाचलो हे मला आठवते. मी तिथे आहे हे मला माहित नसतानाही माझ्यासाठी नेहमीच उपस्थित राहिल्याबद्दल देवाचे आभार,” असे चहलने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हंटले आहे.
धनश्रीची पोस्ट
“तणावापासून आशीर्वादांपर्यंत. देव जेव्हा काळजींना आशीर्वादात रूपांतरित करतो तेव्हा ते किती अद्भुत असते. जर आज तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल तणावात असाल, तर तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्याकडे पर्याय आहे. तुम्ही काळजी करू शकता किंवा सर्वकाही देवावर सोपवू शकता. देव तुमच्यासाठी सर्वकाही चांगले करेल, या प्रार्थनेत शक्ती आहे.”असे धनश्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.





