अखेर प्रतीक्षा संपली.! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘War 2’ सिनेमा; अनेक बड्या कलाकारांची असणार फौज

War 2 Film Update | अभिनेता हृतिक रोशन ‘वॉर २’ चित्रपटातून पुन्हा एकदा कबीरच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत ज्युनियर एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपटात एक खास गाणे असणार आहे, ज्यामध्ये बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री असणार आहे.
ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येत असल्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता खूप वाढली आहे. ‘वेक अप सिड’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘ब्रह्मास्त्र’ सारखे चित्रपट बनवणारा अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर आदित्य चोप्राच्या यशराज बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे.
‘वॉर’ २०१९ साली रिलीज झाला होता. या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ एकमेकांना भिडताना दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर आता या चित्रपटाच्या पुढील भागासाठी देखील चाहते कमालीचे उत्सुक आहेत. मात्र, अश्यातच या सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Must say… you have set it up brilliantly even before we have started our marketing of #War2 🔥😎💥😱💪 … there will be mayhem in cinemas on 14 August 2025, worldwide… 😈⚠️‼️🚨🤯 https://t.co/eVmQRLLJtG
— Yash Raj Films (@yrf) March 16, 2025
नुकतंच होळीच्या निमित्ताने या सिनेमाचा एक अधिकृत व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, यामध्ये सिनेमाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर YRF स्पाय युनिव्हर्सच्या वॉर फ्रँचायझीचा दुसरा भाग आहे.
शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे प्रेक्षकांमध्ये वॉर २ ची क्रेझ आणखी वाढली आहे. वॉर २ हा वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील पाचवा चित्रपट आहे. याआधी, एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर, पठाण आणि टायगर ३, या फ्रँचायझीचे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत.
हा व्हिडिओ शेअर करताना YRF ने लिहिले, ‘अर्थात… आम्ही #War2 चे मार्केटिंग सुरू करण्यापूर्वी तुम्ही ते उत्तम प्रकारे सेट केले आहे… १४ ऑगस्ट २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालेल…’ असं यामध्ये सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, २०१९ साली १७० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या वॉर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे ४७५ कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये अभिनेत्री वाणी कपूर देखील मुख्य भूमिकेत झळकली होती.





