अखेर प्रतीक्षा संपली.! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘जवना’चा टीजर; शाहरुखचा नवा अवतार….

मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. जगभरात या चित्रपटाने मोठी कमाई केली. पठाणच्या यशानंतर शाहरुखच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जवान’मधील शाहरुखचा लुक अनेकांच्या पसंतीस पडला असून, हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट असणार आहे. यात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासह अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे. तर या चित्रपटात दीपिका पदुकोण कॅमिओ करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अश्यातच, आता चित्रपट निर्मात्यांनी ‘जवना’ची टीजर रिलीज डेटचा खुलासा केला आहे. चित्रपटाचा टीझर 7 जुलै किंवा 15 जुलैला रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.
निर्मात्यांनी गोषणा केल्यानंतर फॅन्सची उत्सुकता वाढली आहे. शाहरुख आणि चित्रपट दिग्दर्शक एटली मोठ्या स्तरावर हा टिझर लॉन्च करणार आहे. या टीझरच्या माध्यमातून शाहरुखचा नवा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.





