अखेर प्रतीक्षा संपली.! ‘iPhone 16’ लाँचिंगची तारीख आणि वेळ जाहीर; सोबतच येणार Apple Watch अन् बरंच काही…

Apple iPhone 16 Launch: ‘Apple iPhone 16’ मालिकेची अधिकृत लॉन्च तारीख समोर आली आहे. ही मालिका 9 सप्टेंबर रोजी जागतिक आणि भारतीय बाजारात लॉन्च होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी, लीक झालेल्या रिपोर्टमध्ये असे समोर आले होते की Apple iPhone 16 लॉन्च इव्हेंट 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. Apple या वर्षी आयफोन 16 लाइनअपमध्ये चार हँडसेट देखील लॉन्च करेल.
यामध्ये Apple आयफोन 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max भारतात आणि जागतिक बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. याशिवाय वॉच सीरीज 10, वॉच अल्ट्रा 3, वॉच एसई 3, एअरपॉड्स मॅक्स 2 आणि एअरपॉड्स 4 देखील लॉन्च होणार आहेत..
तुम्ही घरबसल्या लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकाल
ॲपल कंपनी या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे. हा कार्यक्रम अधिकृत वेबसाइट, ऍपल टीव्ही आणि यूट्यूब इत्यादीवर थेट प्रवाहित केला जाईल. यासाठी तुम्ही अधिकृत चॅनेलला भेट देऊ शकता आणि Notify Me बटणावर क्लिक करू शकता. यानंतर, जेव्हाही थेट प्रक्षेपण सुरू होईल, तेव्हा तुम्हाला एक अलर्ट मिळेल.
ग्लोटाइम टॅगलाइन
Apple ने आगामी कार्यक्रमासाठी ‘इट इज ग्लोटाइम’ ही टॅगलाइन वापरली आहे, ज्यामुळे या इव्हेंटबद्दल जास्त तपशील उपलब्ध नाहीत. मीडिया रिपोर्ट्समध्ये यापूर्वीही अनेकदा दावा करण्यात आला आहे की, यावेळी AI संदर्भात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळू शकतात. याशिवाय iPhone 16 सीरीजमधील कॅमेरा सेटअपमध्येही बदल दिसून येतील.
आयफोनची किंमत वाढू शकते
Apple iPhone 16 सीरीजचे मॉडेल जुन्या मॉडेल्सपेक्षा थोडे अधिक महाग असू शकतात, त्यामागील कारण उत्पादन खर्च असल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी iPhone 15 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये ठेवण्यात आली होती, तर यावेळी iPhone 16 ची किंमत थोडी जास्त असू शकते.
आयफोन 16 ची किंमत किती?
– आयफोन 16 ची लाँचिंग प्राईज 799 डॉलर म्हणजेच 79,900 रुपये असू शकते.
– आयफोन 16 Plus ची ग्लोबल किंमत 899 डॉलर एवढी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, भारतात या फोनची किंमत 89,900 रुपये असू शकते.
– आयफोन 16 Pro ची लाँचिंग प्राईज 1099 डॉलर म्हणजे भारतात 1,34,900 रुपये एवढी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
– आयफोन 16 Pro Max असून त्याची किंमत ग्लोबल मार्केटमध्ये 1,999 रुपये असू शकते. तर, भारतातील या फोनची किंमत 1 लाख 59 हजार 900 रुपये असण्याची शक्यता आहे.





