अखेर कॅन्सरशी झुंज ठरली अयशस्वी; टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Actor Vibhu Raghav passes away : हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता विभु कुमार सिंह राघव याचे निधन झाले आहे. गेल्या बराच काळापासून अभिनेत्याला कॅन्सरचे निदान झाले होते. या आजाराची झुंज त्याची अपयशी ठरली. मुंबईतील नानावडी रुग्णालयात त्याने अखरेचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर अभिनेत्री कावेरी प्रियम आणि करण वीर मेहरा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
विभु कुमार सिंह राघव याचे खरं नाव वैभव कुमार सिंह राघव असे आहे. त्याने अनेक हिंदी सिरिअल्समध्ये काम केले आहे. त्याला निशा अँड उसके कजिन्स या सिरियलमुळे खरी ओळख मिळाली. याशिवय सावधान इंडिया या सारख्या शोमध्ये देखील त्याने काम केले आहे. २०२२ मध्ये त्याला कर्करोगाचे निदान झाले. अभिनेता त्याच्या फॉलोअर्सना आरोग्यविषयक अपडेट नेहमी देत होता. कॅन्सरबाबत जनजागृती पसरवण्याचं कामंही त्याने केले. अखेर त्याची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली त्याने आजारासोबतचा त्याचा प्रवास इन्स्टाग्रावर पोस्ट लिहित शेअर केला आहे.
अभिनेता विभु राघव मुंबईतील नानावडी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्या मृत्यूच्या काही दिवसअगोदर अभिनेत्री सिंपल कौर, अदिती मलिक आणि इतर सहकलाकारांनी सोशल मीडियावर आवाहन करत उपचारासाठी आर्थिक मदत मागवली होती. त्याच्या निधनाची बातमी समजताच अभिनेत्री सिंपल कौलने तिच्या इन्स्टाग्रामवर वैभवचा फोटो ठेवत स्टोरी शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहली. विभूने १२ एप्रिल या दिवशी त्याची शेवटची पोस्ट इन्स्टावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने ‘एक दिन एक बार’, असं कॅप्शन दिलं होतं.





