Rashmika Post : अखेर नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नाचे लग्न ठरले असल्याची चर्चा रंगली होती. रश्मिकाने स्वतः याविषयी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करून लग्न ठरले असल्याची गोड बातमी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रश्मिकाने दोघांच्या जोडीला VIROSH असे नाव दिले आहे. लग्न नेमकं कधी होणार याची तारीख रश्मिकाने पोस्टमध्ये सांगितलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न करणार असल्याची माहिती आहे. या जोडप्याने लग्नासाठी एक शाही राजवाडा निवडला असून, तिथे फक्त कुटुंबातील सदस्य आणि अगदी जवळचे मित्र उपस्थित असणार आहेत. रश्मिकाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, आमच्या प्रिय चाहत्यांनो. आम्ही नियोजन केले असते, आम्ही निवडले असते, तुम्ही आधीच तिथे होता. खूप प्रेमाने, तुम्ही आम्हाला हे नाव दिले, VIROSH. आज मनाने, तुम्ही आम्हाला दिलेले नाव आम्ही स्विकारतो. आम्ही या नावाने एकत्र येत आहोत. आम्ही याला VIROSH चे लग्न म्हणतो. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्ही नेहमीच आमच्या आयुष्याचा एक भाग राहाल. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम. अशी पोस्ट रश्मिकाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. विजय देवेराकोंडा आणि रश्मिकाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास गेल्या वर्षी विजय “किंगडम” मध्ये झळकला होता. तर गर्लफ्रेंड चित्रपटात रश्मिका मुख्य भूमिकेत होती. आता रश्मिका “कॉकटेल २” या बॉलीवूड चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे, तर विजय देवेराकोंडा “राणाबली” मध्ये दिसणार आहे. हेही वाचा : Samantha Ruth Prabhu: लग्नानंतर सामंथाचा दमदार कमबॅक; ‘मा इंटी बंगाराम’ या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला