अखेर राघवनं शहनाज गिलसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा,’मी लग्न…’

मुंबई – एंटरटेनमेंट क्वीन शहनाज गिल कधी तिच्या वैयक्तिक तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. शहनाज गिलबद्दल गेल्या काही महिन्यापासून अशी चर्चा आहे की ती टीव्ही होस्ट आणि डान्सर राघव जुयालला डेट करत आहे. दोघांनी एकत्र बॉलिवूडमध्ये एकत्र पदार्पण केले. आणि यासोबतच त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू होती. चित्रपटाच्या पडद्यावर दिसलेल्या दोघांच्या केमिस्ट्रीची खऱ्या आयुष्यातही लोक कल्पना करू लागले. जेव्हा-जेव्हा या दोन्ही अभिनेत्यांसोबतच्या नात्याबद्दल चर्चा होते तेव्हा ते हा प्रश्न टाळताना दिसले होते, मात्र आता राघवने या प्रश्नावर मौन तोडत शहनाज गिलसोबतच्या नात्याचे सत्य सर्वांसमोर ठेवले आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राघव जुयालने सांगितले की, ‘शहनाज गिलसोबत त्याचे कोणतेही नाते नाही आणि कधीच नव्हते. लिंकअपच्या बातम्यांना त्याने अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. शहनाग गिल आणि राघवचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे सर्व व्हिडिओ ‘किसी का भाई किसी की जान’च्या शूटिंगदरम्यानचे आहेत.
राघव जुयालची प्रतिक्रिया समोर आल्यापासून चाहत्यांच्याही त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने सांगितले की, दोघांमध्ये कधीच काही नव्हते. याशिवाय आणखी एका व्यक्तीने लिहिले की, दोघे नेहमीच चांगले मित्र होते, लोक काहीही अफवा उडवतात. त्याच वेळी, एकाने लिहिले की शहनाज अजूनही फक्त सिद्धार्थ शुक्लावर प्रेम करते.
प्रोफेशनल लाईफबद्दल बोलताना राघव जुयाल म्हणाला, येत्या काळात अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. राघवने स्पष्ट केले की काही महिन्यांत त्याचे तीन चित्रपट रिलीज होणार आहेत आणि त्याने आपल्या कामाशी लग्न केले आहे. अशात त्याच्याकडे सध्या कोणत्याही नात्यात येण्यासाठी वेळ नाही.





