Sunetra Pawar : अखेर 8 दिवसांनी सुनेत्रा पवारांनी स्विकारला उपमुख्यमंत्री पदाचा पदभार; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मंत्रालयात जात पदभार स्विकारला. आज होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीला त्या हजर राहणार असल्याची शक्यता आहे.

Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधानानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे अर्थ खाते वगळता इतर तीन महत्वाची खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार कधी स्विकारणार याविषयी बोलले जात होते. अखेर ८ दिवसांनी आज १० फेब्रुवारी रोजी मंत्रालयात जात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला.
यावेळी त्यांच्यासमवेत पुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेऊन आणि चैत्यभूमीवर अभिवादन करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पक्ष कार्यालयात जात अभिवादन केले. दुसरीकडे सुनेत्रा पवार या सायंकाळी दिल्लीला देखील जाणार असल्याची माहिती आहे.
आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेत गणरायाचरणी नतमस्तक झाले. सिध्दिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले, पूजा केली. लोककल्याणाचे, विकासाचे कार्य निरंतर पुढे हाकण्यासाठी बळ दे, अशी प्रार्थना केली. pic.twitter.com/krPrfZfvlT
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 10, 2026
तसेच आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत अजित पवारांच्या जागी आता सुनेत्रा पवार या दिसणार आहेत. या बैठकीला त्या हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष असणार आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे मागील आठवड्यात बैठक रद्द झाली होती.
रोहित पवारांची पत्रकार परिषद
बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे, अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी एक्सवरून केली आहे. त्यामुळे ते आज कोणते गौप्यस्फोट अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाप्रकरणी करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीत परदेशी वर्चस्व ; ‘प्रो-इंडिया’ बीएनपीसमोर ‘अमेरिकन’ समर्थक जमात





