लॉकडाऊनचं उल्लंघन पूनम पांडे पडलं महागात; गुन्हा दाखल

मुंबई – कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिक आपल्या घरातच बसून आहे. दरम्यान, हॉट अभिनेत्री आणि मॉडेल ‘पूनम पांडे’ हिला विनाकारण घराबाहेर फिरणं चांगलं महागात पडलं आहे.
लॉकडाऊनचं उल्लंघन करुन पूनम पांडे बीएमडब्ल्यू कारमधून (दि. 10) मरिन ड्राईव्ह परिसरात फेरफटका मारत होती. मरिन ड्राईव्ह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पूनमची कार दिसताच मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी पूनम पांडेविरोधात गुन्हा तर दाखल केला आहे तसंच तिची कार देखील जप्त केली आहे. पूनमविरोधात आयपीसी कलम 269, 188 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
2013 मध्ये नशा चित्रपटातून पूनम पांडे हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पूनम इन्स्टाग्रामवर जोरदार सक्रिय असून 30 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.





