आमदार पवार यांच्या एका फोनने पन्नास हजार रुपये सवलत
Updated On:

वाघोली- शिरूर-हवेली चे आमदार अशोक पवार यांनी पिंपरी सांडस, तालुका हवेली येथील बबन मायाजी भोरडे यांच्या कोरोना उपचाराच्या बिलात केवळ एका फोन काॅलने रू.५० हजार ९५५ एवढी सूट रुबी हॉल क्लिनिक प्रशासनाकडून सवलत मिळवून दिली आहे.
पिंपरी सांडस, तालुका हवेली येथील श्री.बबन मायाजी भोरडे यांना कोरोनाची लागण झाल्याने रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथे उपचार सुरु होते. त्यांना २ लाख ८५ हजार ९५५ रुपयांचे बिल देण्यात आले होते.
या बाबतीत माहिती मिळताच तात्काळ हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधून आमदार पवार यांनी साधून ५० हजार ९५५ रुपये सूट मिळवून दिली आहे सध्या शबबन भोरडे यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.





