FIDE World Women’s Team Championship | भारताला रजतपदक, अंतिम फेरीत रशियाकडून पराभव
Updated On:

नवी दिल्ली – फिडे जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताला रजतपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशियाने भारतावर 2-0 अशी मात केली.
अंतिम लढतीच्या पहिल्या डावात भारताची अव्वल खेळाडू द्रोणावल्ली हरिकाने चांगली सुरुवात केली. तिने अलेक्झांड्रा गोर्याचकिनाचा पराभव करत विजयी सलामी दिली.
मात्र, भक्ती कुलकर्णीला कतरिना लाग्नोने, तर आर. वैशालीला अलेक्झांड्रा कोस्तेनिऊकने पराभूत केले. तसेच मेरी ऍन गोम्स व एलिना कॅशलिन्सकाया यांच्यातील सामना बरोबरीत सुटला.
त्यामुळे पहिल्या डावात रशियाने 2.5-1.5 अशी सरशी साधली. अंतिम फेरीत पराभव झाला असला तरी भारताने या स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकण्याची दमदार कामगिरी केली.





