मुंबई – सत्तापरिवर्तनासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत. देश सत्तापरिवर्तनासाठी उत्सूक असल्याचे वातावरण आहे. खरंतर महाराष्ट्रातील निकाल स्पष्ट आहे. बरेचसे एक्झिट पोल जरी दाखवत असले तरीदेखील आम्ही त्याहूनही पुढचे आकडे गाठणार आहोत. मविआ राज्यात 35 पेक्षा कमी जागा जिंकणार आहे, असा विश्वास कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी व्यक्त केला. विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेससाठी विदर्भातून लाट तयार झाली आहे. विदर्भात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सत्ताधाऱ्यांवर चिडून लोक मतदानासाठी आले होते. ही निवडणूक जनतेची आहे. विदर्भातील दहा जागा महाविकास आघाडी जिंकेल. सरकारविरोधात वातावरण असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र दाल में कुछ काला है. इंडिया आघाडीच्या सर्वेनुसार, 295 ते 300 जागा मिळतील, त्यामुळे हुकूमशहाचा अस्त ठरलेला आहे.