Dhule Jail : धुळे कारागृहात महिला कैद्याचा गळफास
Updated On:

धुळे – नंदुरबारच्या एका शिक्षकाला ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात तीन दिवसांपूर्वी धुळे कारागृहात आलेल्या न्यायालयीन बंदी तरुणीने बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे.
चंद्रमा संजय बैरागी (२०) असे मृत तरुणीचे नाव आहे. मृत तरुणीचे बुधवारी इनकॅमेरा शवविच्छेदन होणार आहे. नंदुरबार येथील शिक्षकाला धुळ्यात बोलवून त्याच्यासोबत अश्लील फोटो काढले आणि ब्लॅकमेल करत १२ लाखांची खंडणी मागितली, असा तिच्यावर आरोप होता.
त्यानंतर तिला १५ जानेवारी रोजी अटक झाली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने तिची धुळे कारागृहात रवानगी केली होती. तिच्याकडे कोणतीही चिठ्ठी नव्हती, असे कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी सांगितले.





