“पूजा कमी पार्टी जास्त वाटते,”; अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Arjun Bijlani | गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्जुन बिजलानीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. सध्या सोशल मिडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र त्याचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
अर्जुन बिजलानीच्या घरातील गणेशोत्सवाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहतात. यावेळीही अनेकांनी त्याच्या घरी हजेरी लावली होती. मात्र त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं की, गणपतीची आरती सुरु असताना त्यावर कलाकार डान्स करत आहेत. बाप्पाची पूजा आणि भक्ती करताना कलाकारांचा धांगडधिंगा पाहून नेटकरी संतापले आहेत.
View this post on Instagram
यामध्ये अर्जुन, त्याची पत्नी नेहा याशिवाय निया शर्मा, क्रिस्टल हे कलाकारही डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स बघून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे भटजी तिथे उपस्थित असूनही त्यांनी रोखलं नाही म्हणून नेटिझन्स आणखी भडकले आहेत. Arjun Bijlani |
“नुसता दिखावा”,”ही पूजा कमी पार्टी जास्त वाटत आहे”,”पूजा कमी नौटंकी जास्त,” “देवाच्या नावाखाली ते पार्टी आणि डान्स करतात हे योग्य नाही. आपल्या देवतांचा आदर करा”, असे म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Arjun Bijlani |
हेही वाचा:





