Nishikant Dube | मराठीची धास्ती अन् दुबेंची दांडी; महाराष्ट्र सदनात येणं टाळलं

Nishikant Dube | राज्यात हिंदी-मराठी भाषेच्या वादादरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मराठीविरुद्ध दंड थोपडले. इतकेच काय तर ‘पटक पटक के मारेंगे’ असं विधान केले. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत, निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना संसदेच्या लॉबीमध्ये धारेवर धरलं. त्यावेळी दुबे यांनी तेथून पळ काढला होता. त्यांच्या या विधानामुळेच आता ते अडचणीत सापडले आहेत.
यानंतर आता निशिकांत दुबे यांना संसदरत्न पुरस्कारकडे पाठ फिरवावी लागली आहे. महाराष्ट्र सदनामध्ये शनिवारी संसदरत्न पुरस्कारांचे वितरण झाले. या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचाही समावेश होता. पण, शनिवारी सदनातील या कार्यक्रमाला दुबेंनी दांडी मारली.
संसदरत्न पुरस्कार २०२५
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदरत्न पुरस्कार २०२५ जाहीर झाला असून, यंदा १७ खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांचा सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सात खासदारांनी या यादीत स्थान मिळवून राज्याचा गौरव वाढवला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे, शिवसेना (ठाकरे गट) नेते अरविंद सावंत, शिवसेनेचे श्रीरंग अप्पा बारणे आणि नरेश म्हस्के, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, भाजपाच्या स्मिता उदय वाघ आणि मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. Nishikant Dube |
संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या १७ खासदारांमध्ये भर्तृहरी मेहताब, रवी किशन, निशिकांत दुबे, एन. के. प्रेमचंद्रन, प्रवीण पटेल, विद्याुत बरन मेहतो, दिलीप सैकिया, चरणजीतसिंह चन्नी आदींचा समावेश होता. पुरस्कारांचे वितरण केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते झाले. या समारंभाला निशिकांत दुबे गैरहजर राहिले. Nishikant Dube |
लोकसभेतील लॉबीमध्ये झालेल्या कोंडीनंतर महाराष्ट्र सदनात जाऊन पुन्हा अडचणीत सापडण्याची भीती वाटल्यानेच दुबेंनी संसदरत्न पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणे टाळले असल्याची चर्चा महाराष्ट्र सदनामध्ये रंगली होती. मात्र मराठीच्या मुद्द्यावरून दुबेंना लोकसभेच्या लॉबीत जाब विचारणाऱ्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सन्मानपूर्वक हा पुरस्कार स्वीकारला. Nishikant Dube |
महिला खासदारांनी दुबेंना विचारला जाब
मराठी-हिंदी वादामध्ये दुबे यांनी मराठी राजकीय नेत्यांना आव्हान दिले होते. दुबेंच्या या आव्हानाला लोकसभेतील काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी तितक्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले होते.
हेही वाचा :
Pimpri : बालवाडीच्या वर्गखोल्या झाल्या आकर्षक





