Nevasa : कोतवाली पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा विक्री करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या, आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल

नेवासा : अहिल्यानगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नेवाशाच्या सचिन पांडूरंग घोरतळे (वय३८) याच्याकडून कोतवाली पोलिसांनी एक गावठी बनावटीचा कट्ट्यासह सहा जिवंत काडतूसाची विक्री करतांना रंगेहाथ पकडले. या आरोपीवर आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घोरतळे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती यावेळी पोलीस सुत्रांनी बोलताना दिली.
नेवासा शहरात राहणाऱ्या सचिन घोरतळे या आरोपीकडून नगरच्या कोतवाली पोलिसांनी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात त्याला गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसासह विक्री करताना अटक केली. नेवासा पोलीस ठाण्यात घोरतळे याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे. आरोपी सचिन घोरतळे याच्यावर सदरची कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने केली आहे.





