FDA Action : तुकाराम मुंढेंची औषध विक्रेत्यांवर धडक कारवाई; ७१ परवाने निलंबित, २९ रद्द
FDA Action : अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे.

FDA Action : राज्यात औषध विक्रेते आणि खाद्यपदार्थ उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. औषध विक्रीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, नाशिकमध्ये एका मसाला उत्पादकाच्या आस्थापनेवर छापा टाकून २ हजार २३० किलो मसाला जप्त करण्यात आला आहे. या मसाल्याची किंमत ११ लाख ६४ हजार रुपये असल्याची माहिती आहे. (FDA Action)
राज्यभरात औषध विक्रेत्यांची तपासणी
५ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभरात औषध विभागाकडून ९३७ तपासण्या करण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आणि विविध त्रुटी आढळल्याने ४५० नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच ७१ औषध विक्रेत्यांचे परवाने निलंबित, तर २९ परवाने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (FDA Action)
औषधांची गुणवत्ता, साठवणूक आणि विक्रीसंदर्भातील नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी या मोहिमेदरम्यान करण्यात आली. औषध विक्रीतील अनियमितता रोखण्यासाठी FDA कडून राज्यभरात तपासणी मोहीम राबवली जात आहे. (FDA Action)
नाशिकमध्ये २,२३० किलो मसाला जप्त
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी FDA कडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नाशिकमधील तिगरानिया औद्योगिक क्षेत्र परिसरातील मे. सोमेश्वर घरगुती मसाले या आस्थापनेवर छापा टाकण्यात आला. (FDA Action)
या कारवाईत एकूण २ हजार २३० किलो मसाला जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची किंमत ११ लाख ६४ हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. (FDA Action)
पॅकिंग आणि लेबलिंगमधील त्रुटींमुळे कारवाई
मसाल्यांच्या पॅकिंग आणि लेबलिंगमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय प्रशासनाला आहे. लेबलवरील माहिती आणि संबंधित नियमांचे पालन याबाबत त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (FDA Action)
जप्त करण्यात आलेल्या मसाल्यांमध्ये हळद पावडर, कांदा-लसूण मसाला, धणे पावडर, गरम मसाला, स्पेशल मिक्स काळा मसाला, काळा मसाला आणि मिरची पावडर यांचा समावेश आहे. (FDA Action)
सणासुदीत FDA ची विशेष मोहीम
दिवाळीच्या काळात मिठाई, मसाले, तेल, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि लेबलिंगच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर FDA कडून लक्ष केंद्रित केले जात आहे. (FDA Action)




