Fatigue: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना सतत थकवा जाणवण्याची समस्या भेडसावत आहे. ऑफिसमध्ये कामात मन लागत नाही आणि घरीसुद्धा उत्साह वाटत नाही, अशी तक्रार अनेकांकडून ऐकायला मिळते. हा थकवा केवळ आळस नसून, त्यामागे शारीरिक आणि मानसिक कारणे असू शकतात. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. तज्ञांच्या मते, थकवा मुख्यतः दोन प्रकारचा असतो, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक थकवा हा विश्रांती घेतल्यावर लवकर कमी होतो. मात्र मानसिक थकवा दूर होण्यासाठी अधिक वेळ लागतो. अनेकदा लोकांना थकवा नेमका कोणत्या कारणामुळे येतोय, हे समजत नाही आणि त्यामुळे ही समस्या वाढत जाते. थकवा येण्याची प्रमुख कारणे Fatigue दिवसभर जास्त शारीरिक मेहनत करणे किंवा अति व्यायाम करणे यामुळे शरीर थकते. याशिवाय, अपुरी झोप हे देखील थकव्याचे मोठे कारण आहे. ताणतणावात सतत राहिल्याने मानसिक थकवा वाढतो. शरीरात रक्ताची कमतरता (अॅनिमिया) किंवा व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यासही अशक्तपणा जाणवतो आणि थकवा वाढतो. Fatigue थकव्याची लक्षणे ओळखा Fatigue हिवाळ्यात थकवा अधिक जाणवतो आणि त्यामुळे उत्साह कमी होतो. कामात लक्ष न लागणे, नकारात्मक विचार वाढणे, सतत झोप येणे आणि अशक्तपणा जाणवणे ही थकव्याची प्रमुख लक्षणे आहेत. ही लक्षणे वेळेत ओळखून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. थकवा दूर करण्यासाठी सोपे उपाय Fatigue थकवा कमी करण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात सकाळच्या उन्हात काही वेळ उभे राहिल्यास शरीराला ऊर्जा मिळते. चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि ताण कमी होतो. तसेच सुगंधी तेलाने शरीराची मालिश केल्यासही थकवा दूर होण्यास मदत होते. दररोज नियमित व्यायाम किंवा योग करणे आवश्यक आहे, मात्र अति व्यायाम टाळावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. यासोबतच ताणतणाव कमी ठेवण्यासाठी सकारात्मक विचार आणि रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करावा. एकूणच, सतत थकवा येणे ही सामान्य गोष्ट नाही. योग्य वेळी कारणे ओळखून जीवनशैलीत बदल केल्यास ही समस्या सहज नियंत्रणात आणता येऊ शकते.