सासऱ्याला करायचे होते दुसरे लग्न, सुनेलाच दिली सासूचा काटा काढण्याची सुपारी आणि…

इंदौर – एका महिलेच्या हत्याप्रकरणी पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मृतक महिलेच्या पतीनेच तिला ठार मारल्याने सर्वांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हे कांड करण्यासाठी व्यक्तीने आपल्या सुनेची मदत घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले. दुसरं लग्न करण्यासाठी हा प्रकार केल्याच देखील तपासनांतर स्पष्ट झालं.
चार दिवसांपूर्वी गावात महिलेच्या हत्येची घटना समोर आली होती. याचा खुलासा करत पोलिसांनी शुक्रवारी महिलेची सून आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले. दुस-या महिलेशी संबंध असल्याने महिलेच्या पतीने आपल्या सुनेसोबत मिळून पत्नीच्या हत्येचा कट रचला असल्याचे समोर आले आहे. पत्नीचा अडसर दूर करण्यासाठी पतीनेच पत्नीचा काटा काढला.
रीवा जिल्ह्यातील मंगवाण पोलिसांनी महिलेच्या हत्येचा खुलासा करत पती आणि सुनेला अटक केली. आरोपींच्या चौकशीत एक धक्कादायक खुलासा समोर आला. यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खरे तर महिलेच्या पतीचे बाहेरील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते तसेच सुनेचा सासूकडून वारंवार छळ होत होता.
यामुळे व्यथित होऊन सासरच्या मंडळींनी सुनेसह पत्नीच्या हत्येचा कट रचला, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ महिलेच्या पतीला आणि त्याच्या मुलीला अटक केली. सासऱ्यांनी पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी खुनाचा खुलासा केला आहे. मध्यप्रदेशातील रिवा जिल्हातील हा धक्कादायक प्रकार असून मनगवा क्षेत्रातील अतरेला गावात ही घटना घडली.





