हगवणे पिता-पुत्राला बेड्या; सुषमा अंधारेंनी उपस्थित केले तीन प्रश्न, महिला आयोगाबाबत म्हणाल्या…

Sushma Andhare’s reaction on Vaishnavi Hagavane’s death case : वैष्णवी मृत्यू प्रकरणातील तिची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली असून, गेल्या सात दिवसांपासून फरार असणारा तिचा सासरा आणि दीराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे २३ मे रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई करत पिता-पुत्राला बेड्या ठोकल्या आहेत.
यानंतर आता उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त करत सासरा आण दीर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले की आरोपी स्वतः हून हजर झाले अजून स्पष्ट झाले नाही, असे म्हटले आहे. तसेच आरोपींना राजकीय पाठबळ मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या सोशल मीडिया फेसबुवर अकाउंवरून त्यांनी पोस्ट लिहिली आहे.
सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणांमध्ये पहाटे साडेचार वाजता दीर आणि सासरा यांना अटक झाली. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतले की आरोपी स्वतः हून हजर झाले अजून स्पष्ट झाले नाही. जर आरोपी स्वतःहून हजर झाले असतील तर आरोपींना राजकीय पाठबळ आहे हे गोष्ट अधिकच जात अधोरेखीत होते.
आयोगावर ओढले ताशेरे
काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आले असे जेव्हा आत्ता सहा दिवसापासून रुसून बसलेला महिला आयोग सांगत असेल तर वैष्णवीचा जीव गेल्यापासून पाच दिवस होऊन गेल्यानंतरही सरकार ॲक्शन मोडमध्ये का आले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. वैष्णवी प्रकरणात आरोपींना अटक होत असतानाच नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये भक्ती अथर्व गुजराती या तरुणीने सासरच्या चाचला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात सरकार आणि सुस्तावलेला आयोग ॲक्शन मोडमध्ये कधी येणार आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
पिता पुत्राचा मटणावर ताव
बावधन पोलिसांंनी हगवणे बाप आणि मुलाला तळेगाव येथील एका हॅाटेलमधून पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अटक केली. अटकेची कारवाई पोलिसांनी सापळा रचून केली आहे. मात्र, येथील एका हॅाटेलमध्ये दोघे पिता पुत्र यांनी मटणावर ताव मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना पोलिसांना अटक केल्यानंतर दोन फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. पण आरोपी हे तळेगावमध्येच सापडल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





