Newasa News : हृदयद्रावक घटना..! भीषण अपघातात आठ महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू
Newasa News : नेवासा-नेवासा फाटा मुख्य रस्त्यावरील आराध्या लॉन्ससमोर शनिवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला.

Newasa News : नेवासा-नेवासा फाटा रस्त्यावर आराध्या लॉन्ससमोर आज (दि. १०) दुपारी झालेल्या भीषण अपघातात आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. मिस्बा आरिफ देशमुख (वय २०, रा. जुने कोर्ट गल्ली, नेवासा खुर्द) असे मृत महिलेचे नाव आहे. सोनोग्राफी करून दुचाकीवरून घरी परतत असताना ट्रकने धडक दिल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Newasa News)
सोनोग्राफी करून परतताना अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, मिस्बा देशमुख या आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास नेवासा फाटा येथून सोनोग्राफी करून दुचाकीवरून नेवासा खुर्दकडे परतत होत्या. त्या आराध्या लॉन्ससमोर आल्या असताना ट्रक क्रमांक एमएच ०९ बीसी २५४ ची त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक बसली. (Newasa News)
समोरील वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. धडकेनंतर मिस्बा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Newasa News)
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
कुटुंबीय बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा करत असतानाच या दुर्घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सोनोग्राफी करून घरी परतणाऱ्या मिस्बा यांच्याबाबत घडलेल्या या घटनेमुळे नेवासा परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Newasa News)
नेवासा पोलिसांकडून तपास
अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार गणेश नागरगोजे करत आहेत. अपघाताची नेमकी कारणे आणि इतर तपशील तपासातून स्पष्ट होतील. (Newasa News)
अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
नेवासा-नेवासा फाटा रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण आणि रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. या मार्गावर अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Newasa News)

