Famous singer Rahul Fazilpuria fatal attack : प्रसिद्ध गायकावर जीवघेणा हल्ला; गावी जात असताना घडली घटना, थारमधून आले अन्…

Famous singer Rahul Fazilpuria shot dead : प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गुरुग्राम येथे अज्ञातांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्यावर बादशाहपूर पोलीस ठाण्याअंदर्गत येणाऱ्या एसपीआर रोडवर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती आहे.
राहुल फाजिलपुरिया हा फाजिलपूर या त्याच्या गावातून जात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुद गोळ्या झाडायला सुरूवात केली. यानंतर फाजिलपुरिया याने तिथून पळ काढल्याने तो या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, हुल फाजिलपुरिया हा फाजिलपूर या त्याच्या गावी जात असताना गुरुग्रामच्या सदर्न पेरिफेरल रोडवर पांढऱ्या रंगाच्या थारमधून आलेल्या ५ जणांनी त्याचा पाठलाग केला. त्याच्या दिशेने अंधाधुंद तीन राऊंड फायर केले. प्रसंगवधान दाखवत राहुल याने त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात तो बचावला आहे. सध्या या प्रकरणी पोलीस पुरावे गोळा करत आहेत.
मात्र, या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली असून, राहुल याच्यावर कोणत्या कारणामुळे हल्ला करण्यात आला याचे कारण अस्पष्ट असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच हल्लेखोर कोण होते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. गुरुग्राम पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाचा वेगाने तपास केला जात आहे.
कोण आहे राहुल फाजिलपुरिया?
राहुल फाजिलपुरियला हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याने अनेक रॅप साँग आणि अल्बम्स यासाठी गाणी केली आहेत. याशिवाय त्याने कपूर अॅन्ड सन्स या बॅालीवूड चित्रपटातील ‘चुल’ हे रॅप साँग गायले आहे. या गाण्यानंतर त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादवचा तो जवळचा मित्र आहे. त्याचं खरं नाव राहुल यादव आहे. राहुल फाजिलपुरियलाने जननायक जनता पक्षाने (जेजेपी) च्या तिकिटावर लोकसभेची निवडणुकही लढवली होती. पण त्याच्या वाट्याला पराभव आला.
हेही वाचा : राज्यात जोरदार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन





