आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; प्रसिद्ध पान मसाला कंपनी मालकाच्या पत्नीचा मृत्यू

UP Accident | कानपूरच्या प्रसिद्ध केसर पान मसाला कंपनीचे मालक हरीश माखिजा यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला आहे. इटावा येथील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर प्रीती माखिजा यांच्या कारचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केसर पान मसाला कंपनीचे मालक हरीश मखिजा, त्यांच्या पत्नी प्रीती मखिजा, मद्य व्यावसायिक तिलक राज शर्मा यांची पत्नी आणि चालक असे चार जण प्रवास करत होते. या अपघातात प्रीती माखिजा यांचा मृत्यू झाला, इतर जण जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं ?
हरीश माखिजा आणि तिलक राज शर्मा एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह आग्रा येथे जात असल्याची माहिती मिळते आहे. त्यांची कार 79 मैनपुरीच्या करहल टोलजवळ येताच टायर फुटला आणि कार अचानक उलटली. त्यांच्या कारचा टायर फुटून हा अपघात झाला. हरीश मखिजा उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांचे नातेवाईक आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच जखमींना सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर माखिजा यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा:
खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा; राज्य सरकारचा मोठा निर्णय





