फारुख अब्दुल्लांच मोठं विधान म्हणाले,’प्रभू श्रीराम फक्त तुमचे नाहीत तर आम्हा सर्वांचे’

राज्यसभेत सोमवारी बोलताना मोदी यांनी शेतकरी आंदोलनामागे असणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. आंदोलनाशिवाय राहू न शकणाऱ्या आंदोलनजीवी लोकांचा नवा वर्ग देशात उदयाला आला आहे, अशी टिप्पणी मोदी यांनी केली. त्याचा संदर्भ नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
फारुख अब्दुल्ला म्हणाले,’मोदी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्याने काय नुकसान होणार आहे का? “तोडगा काढा, आपण येथे तोडगा काढण्यासाठी आलो आहोत, अडथळे निर्माण कऱण्यासाठी नाही. असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ते पुढे म्हणाले,’ देवाने सर्वांना सामान बनविले आहे. डॉक्टर कधीच धर्म पाहून उपचार करीत नाही. असे विचारत नाही क्ताच्या बाटलीकडे हिंदूचं आहे की मुस्लीम व्यक्तीचं असं विचारत नाही. मग हिंदू मुस्लिम भेदभाव कशाला ? ” प्रभू श्री राम संपूर्ण जगाचे आहेत. राम आम्हा सर्वांचे आहेत. तसेच कुराण देखील फक्त आमचं नाही.’ असं धर्मवरून देशात बांधलेल्या मुद्यावर त्यांनी आपलं मत मांडले.





