देहर्‍यात शेतकर्‍याची आत्महत्या

तालुक्यातील पाचवी घटना
अहमदनगर: नगर तालुक्यातील देहेरे येथील शेतकर्‍यांने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही पाचवी आत्महत्याअसून दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढतच चालल असल्याची परिस्थिती आहे.

विक्रम उर्फ बाळासाहेब हरिदास काळे (वय-45, रा. देहरे, ता. नगर), असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. घराजवळच असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. मागील वर्षीचा दुष्काळ व यावेळी अद्यापर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतीव्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात नगर तालुक्यातील ही पाचवी आत्महत्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.