‘या’ मागण्यांसाठी पंजाबातील शेतकऱ्यांची पुन्हा जंतरमंतरवर निदर्शने

नवी दिल्ली – पाण्याचे समान वाटप करावे आणि किमान आधारभूत किंमतीचे आश्वासन त्वरित लागू करावे, या मागणीसाठी पंजाबातील शेतकरी पुन्हा दिल्लीत आले आहेत. त्यांनी आज जंतरमंतर येथे या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. पाच शेतकरी संघटनांनी दिल्लीत हा निदर्शनांचा कार्यक्रम आयोजित केला होता.
अत्यंत कडक बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून निवेदनही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या निवेदनात, शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य वितरण सुनिश्चित करण्याची आणि केंद्राने दिलेल्या आश्वासनानुसार किमान आधारभूत किंमत योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.
पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील आंदोलक शेतकरी जर्नेल सिंग म्हणाले की, पंजाबातील सर्व पाणी राजस्थान आणि दिल्लीला जात आहे. पंजाबी शेतकरी काय करतील? सरकारने गहू आणि डाळींवरील एमएसपीवरही काही केले नाही. आमच्या कुटुंबांचे हाल होत आहेत.





