Nagar | समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
Updated On:

चांदा, (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात समाधानकारक पाऊस झाला असून, बळीराजा सुखावला आहे. सोमवारी दुपारी दोन तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून बळीराजा सुखावला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून ते अंदाजे साडेसहा वाजेपर्यंत हलक्या पावसाच्या सरी होत होत्या. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, कांदा उसाचे व तर पिकांचे भरणे झाले असून पिकांना जीवदान मिळाले आहे.
हा पाऊस चांदा व परिसरातील बऱ्हाणपूर, म्हाळस पिंपळगाव, रस्तापूर, लोहारवाडी या गावात झाला. त्यामुळे या परिसरातील शेतकंऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
अजून मोठ्या पावसाची गरज या भागाला आहे. कारण विहिरी, बोअरवेल अजून कोरडेच आहेत. मोठा पाऊस होऊन ओढे, नाले वाहते झाल्यावर विहिरी बोअरवेलचे पाणी वाढतील, अशी अपेक्षा या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.





