Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत संभ्रम? पात्रतेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
Farmer Loan Waiver : २ लाखांपर्यंत कोणत्याही बँकेतून घेतलेलं पीककर्ज हे आम्ही माफ करणार - मुख्यमंत्री फडणवीस

Farmer Loan Waiver : अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्य सरकार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे.
मात्र या कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी नेमके कोणते असणार? याबाबत निर्माण झालेला संभ्रम स्वत: मुख्यमंत्री फडणविसांनी दूर केला. तसेच विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. तसेच जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
कोणत्याही बँकेचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत स्पष्ट करताना काही अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगितले. “काहीजण राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज माफ होणार नाही, तर काहीजण जिल्हा बँका किंवा सहकारी संस्थांच्या कर्जाबाबत संभ्रम निर्माण करत आहेत. कोणी म्हणतंय, राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा बँक किंवा अमूक एका सोसायटीची कर्जमाफी होणार नाही.
पण आम्ही २ लाखांपर्यंत कोणतीही बँक असो ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणत्याही बँकेतून घेतलेलं पीककर्ज माफ करणार आहे, ” असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका किंवा पतसंस्था अशा सर्व ठिकाणांहून घेतलेल्या पीक कर्जाचा या योजनेत समावेश होणार आहे. Farmer Loan Waiver
कर्जमाफीचा फायदा बँकांना नाही तर थेट शेतकऱ्यांना
“कर्जमाफीचा फायदा बँकांना नव्हे तर थेट शेतकऱ्यांना मिळावा यासाठी योजना तयार केली जात आहे. आम्ही यापूर्वीच सांगितलं की, ३० जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे अर्थसंकल्पात ती आली असल्यामुळे पुढील कार्यवाही सुरू होईल. कमिटी यावर काम करत आहे. कमिटी बाकी सगळ्या गोष्टी सांगेल. जुन्या कोणत्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल”, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. Farmer Loan Waiver
कोणते शेतकरी पात्र ठरणार?
- दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी.
- केवळ पीक कर्ज थकबाकी असलेले शेतकरीच या योजनेसाठी पात्र असतील.
- 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफीसाठी ग्राह्य धरले जाईल.
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ दिला जाईल. Farmer Loan Waiver
हेही वाचा:






