‘तुफान’ चित्रपटातील फरहानचा दमदार लूक प्रदर्शित
Updated On:

मुंबई – अभिनेता फरहान अख्तर लवकरच आपल्या आगामी ‘तुफान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटातील फरहानचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये तो निळ्या रंगाच्या जर्सी मध्ये दिसून येत आहे. ‘तुफान’ चित्रपटात फरहान एका बॉक्सिंगपटूची भूमिका साकारताना दिसणारा आहे. दरम्यान, ‘तुफान’ चित्रपट येत्या २ ऑक्टोबर २०२० रोजी चित्रपटगृहात येणार आहे.





