‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप

Home Minister Tv Serial | झी मराठीवर मागील 20 वर्ष अविरतपणे ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम सुरू आहे. मात्र आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘दार उघड बये’ असं म्हणत लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर हे संवाद कौशल्यामुळे घराघरातील गृहिणींची सुखदुःखं वाटून घेत होते.
या कार्यक्रमामुळे अनेक दुरावलेली नाती नव्याने जुळली. अनेक वर्षांपासून न भेटलेले नातेवाईक भेटले. रोजच्या जीवनातून गृहिणींना थोडासा विसावा या कार्यक्रमाने दिला. मात्र आता हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. Home Minister Tv Serial |
याबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, ‘२० वर्षं आनंदाची होती. झी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून २० वर्षांत साधारण ६५०० भाग, अंदाजे ६ लाख २२५० कुटुबांसोबत थेट संवाद साधता आला. विविध कार्यक्रमांमधून ६० लाख प्रेक्षकांना आनंद देता आला. या प्रवासात अनेक कुटुंबांना आणि माऊलींना भेटत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान ऊर्जा देत होते आणि अजूनही अनेक कुटुंब ‘होम मिनिस्टरची’ वाट बघत आहेत. २० वर्षांच्या या प्रवासानंतर आता वेळ आली आहे विश्रांतीची. तेव्हा आज्ञा असावी.’ Home Minister Tv Serial |
या कार्यक्रमाचा शेवटचा भाग हा येत्या काही दिवसांत प्रक्षेपित होणार आहे. २०व्या वर्षपूर्तीनिमित्त गणपती विशेष भाग चित्रित करण्यात येणार आहे.
हेही वाचा:
काँग्रेस-आप युतीबाबत संभ्रम कायम ; निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांनी दिले वेगवेगळे संकेत





