फरदीन खानने केले शर्मिन सहगलचे समर्थन, म्हणाला “ट्रोल करणे चुकीचे…”

Sharmin Segal Trolled| दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसिरीजला देशातच नव्हे तर जगभरातून भरभरून प्रेम मिळाले आहे. यातील अनेक कलाकारांचे लोकांनी तोंडभरून कौतुक केले, तर यातील संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिल सहगलला मात्र नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले. तिच्या ‘एक्स्प्रेशनलेस’ अभिनयामुळे तिच्यावर टीका करण्यात आली.
शर्मिलने ‘हिरामंडी’मध्ये आलमजेबची भूमिका साकारली होती. यातील तिचा अभिनय अनेकांच्या पसंतीस पडला नाही. सोशल मीडियावर देखील व्हिडीओद्वारे तिला ट्रोल करण्यात आले. यावर आता अभिनेता फरदीन खानने शर्मीन सहगलला पाठिंबा देत ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.
नुकतेच एका मुलाखतीत फरदीन खान म्हणाला, “मला वाटते की हे ट्रोलिंग अत्यंत दुर्दैवी आहे. कोणाचा तरी परफॉर्मन्स आवडावा किंवा न आवडावा हा अधिकार प्रत्येकाला आहे, पण हे ट्रोलिंग चुकीचे आहे. मला वाटते तिने हिरामंडीमध्ये खूप चांगले काम केले आहे. तिचीभूमिका अतिशय गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक होती. ती काही मोठ्या कलाकारांसोबत काम करत होती. मला तिची कामगिरी सुंदर वाटली आणि त्याच्या कारकिर्दीची ही चांगली सुरुवात होती.” Sharmin Segal Trolled|
शर्मीन सहगलने 2019 मध्ये रोमँटिक-ड्रामा चित्रपट ‘मालाल’ ने आपल्या करिअरची सुरुवात केली, जो मीझान जाफरीचा पहिला चित्रपट होता. याची निर्मिती संजय लीला भन्साळी यांनी केली होती. मात्र, कमाईच्या बाबतीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही आणि फ्लॉप ठरला. Sharmin Segal Trolled|
दरम्यान, ‘हिरामंडी’ ही संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 8 भागांची वेब सिरीज आहे. या मालिकेद्वारे त्याने डिजिटल पदार्पण केले आहे. 1 मे 2024 पासून OTT Netflix वर प्रदर्शित झालेला ‘हिरामंडी’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वीच ‘हिरामंडी 2’ या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा :





