Salman Khan: सलमान खानचा कार्यक्रमातील लुक पाहून चाहत्यांना ‘तेरे नाम’ चित्रपटाची आठवण
Salman Khan: आमिर, करीना कपूर आणि सलमान खानने एकत्र पोज दिली

Salman Khan: आमिर खान प्रोडक्शनच्या ‘लगान’ सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या इव्हेंटला हजेरी लावली. यावेळी आमिर, करीना कपूर आणि सलमान खानने एकत्र पोज दिली.
मात्र यावेळी सलमानच्या खास लुकने सर्वाधिक लक्ष वेधलं. त्याचा लूक ‘तेरे नाम’ सिनेमातील राधे सारखा दिसत होता. करीना आणि आमिरही त्याला पाहून शॉक झाले.
या कार्यक्रमात सलमान खान अगदी लहान केसांच्या एका नवीन लुकमध्ये दिसला. हा लुक त्याच्या आगामी चित्रपटासाठी आहे का? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, कारण सलमान खानने या कार्यक्रमासाठी पूर्णपणे काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. Salman Khan
View this post on Instagram
‘लगान’ चित्रपटाचा २५ वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि आमिर खान अभिनीत हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी नुकताच या री-रिलीजचा ट्रेलर लाँच केला. २००१ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मार्च महिन्यात सलमान ‘मातृभूमी’ नावाच्या वॉर ड्रामा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. यात तो भारतीय सैन्यातील एका कर्नलच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात तोचिनी सैन्याच्या मोठ्या तुकडीविरुद्ध आपल्या सैनिकांचे नेतृत्व करताना दिसणार आहे. Salman Khan
हेही वाचा:
Shirur News : क्रिकेट स्पर्धेदरम्यान बॅनरवरून वाद अन् थेट फायरींग; 2 मुख्य आरोपी साताऱ्यातून जेरबंद





