कपिल शर्माचा नवा लुक पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Kapil Sharma | कॉमेडी किंग कपिल शर्मा नुकताच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. यावेळी पापाराझींनी कपिलचे काही फोटो आणि व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केले. सध्या त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ज्यात त्याच्या वजनात लक्षणीय घट दिसून येत आहे. त्याच्या या नव्या लुकमुळे चाहते आश्चर्य आणि चिंता व्यक्त करत आहे. मुंबई विमानतळावर दिसलेल्या त्याच्या या बदललेल्या रूपामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
कपिल मुंबई एअरपोर्टवर स्टायलिश को-ऑर्ड सेट कपड्यांमध्ये पाहायला मिळाला. मात्र कपिलने त्याचं बरंच वजन कमी केले आहे. पापाराझींनी पोस्ट केलेल्या कपिलच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी कपिलच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
तर काहींनी त्याच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. दरम्यान, कपिल शर्मा सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं-2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या भूमिकेसाठी त्याने वजन कमी केले असल्याचे बोलले जात आहे. कपिलने यापूर्वीही वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.
कपिल शर्मा अनेक वर्षे टीव्हीवर ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यानंतर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ द्वारे तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर लोकप्रिय झाला. Kapil Sharma |
हेही वाचा:





