तिच्या अदा पाहून चाहते घायाळ! अभिनेत्री मुनमुन दत्ताच नव फोटोशूट व्हायरल

Actress Munmun Dutta : टेलिव्हिजनवरील अभिनेत्री मुनमुन दत्ता पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चित आली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय अशा ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील बबिता जी’च्या म्हणजेच मुनमुन दत्ता या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. म्हणूनच तिचा प्रत्येक फोटो तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंवर अपलोड होताच काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. अभिनेत्री मुनमुन परदेशात सुट्टीचा आनंद घेत आहे. जिथून तिने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मुनमुनचा ग्लॅमरस लूक खुलून दिसत आहे. या फोटोत तिने तपकिरी रंगाचा स्लीव्हलेस टॉप आणि मॅचिंग बॉडी फिट स्कर्ट परिधान केला आहे. अभिनेत्रीचा मेकअप आणि तिची स्टाईल चाहत्यांना वेड लावत आहे. फोटो शेअर करताना मुनमुनने कॅप्शनमध्ये , ‘दौगावा नदीचा किनारा…’ असे लिहिले आहे. अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीने पोज देत फोटो काढले आहेत.
या अभिनेत्रीचे चाहते तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काही जण तिला ब्युटी क्वीन म्हणत आहेत तर काही जण तिला एक सुंदर परी म्हणत आहेत. मुनमुन दत्ता गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत बबिताजीची भूमिका करत आहे. ती नेहमी तिच्या सौंदर्यांने चाहत्यांची मनं जिंकत असते. तिचा हा नवा फोटोशेट सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडमध्ये आहे.
View this post on Instagram
हेही वाचा : ज्युनिअर बच्चनच्या पाठीवर कौतुकाची थाप! बिग बी अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचे भरभरून केले कौतुक





