Saif Ali Khan Fitness: सैफ अली खानचा 56व्या वर्षातील फिटनेस पाहून चाहते चकित; करीना कपूर म्हणाली…
Saif Ali Khan Fitness: अलीकडेच सैफ अली खानचे इनस्टाग्रामवर पदार्पण

Saif Ali Khan Fitness: अभिनेता सैफ अली खानने नुकतेच त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केले आहे. त्यानंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मिडियावर शेअर करत असतो. मात्र, त्याने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.
वयाच्या ५६व्या वर्षी शर्टलेस होऊन सूर्यनमस्कार करतानाचा त्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्याचा फिटनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे. त्याची बहीण सोहा अली खान आणि पत्नी करीना कपूर खान यांनीही त्याचे कौतुक केले आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना सैफ अली खानने लिहिले, “कामाला पुन्हा सुरुवात करण्याची वेळ आली आहे. नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने करण्यासाठीआधी मनाला, मग शरीराला पुन्हा योग्य मार्गावर आणायचे आहे.” या व्हिडीओवर कमेन्ट करत करीना कपूरने “सूर्यनमस्काराच्या बाबतीत तू मला मागे टाकलंस,” असे लिहिले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, करीना कपूर खान सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. मात्र अलीकडेच सैफ अली खानने इनस्टाग्रामवर पदार्पण करताच त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. काही वेळातच त्याची फॉलोअर्सची संख्या मिलियन पर्यंत गेली. सध्या त्याचा मोकळ्या, हिरव्यागार अंगणातील योगासनाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
हेही वाचा:





