आयुष्मान खुरानाच्या कॉन्सर्टदरम्यान चाहत्याने केली पैशांची उधळण; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं

Ayushmann Khurrana | बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना उत्तम अभिनेत्यासह एक गायकही आहे. त्याने शिकागो, न्यूयॉर्क या ठिकाणी लाईव्ह शोज केले आहेत. मात्र आयुष्यमानला न्यूयॉर्क कॉन्सर्टमध्ये एक विचित्र अनुभव आला. एका चाहत्याने स्टेजवर त्याचे कौतुक करण्यासाठी त्याच्यावर डॉलर्सचा (पैसे) वर्षाव केला. परंतु त्यावर त्याने केलेल्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आयुष्मान खुराना केवळ त्याच्या गाण्यांनीच नव्हे तर त्याच्या अमेरिका दौऱ्यात आपल्या नम्रतेनेही मन जिंकली आहे. चाहत्यांच्या या कृतीला विरोध दर्शवत आयुष्मानने परफॉर्मन्समध्येच थांबवून त्यांना एक सल्ला दिला. यावेळी आयुष्मानने चाहत्याला पैसे दान करण्यास सांगितले. सोशल मीडियावर आयुष्मान खुरानाचा कॉन्सर्टदरम्यानचा तो व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अचानक डॉलरचा वर्षाव करण्याऱ्या चाहत्याला अभिनेता आवाहन करताना दिसत आहे.
आयुष्मान म्हणतो की, “कृपया असं काही करू नका. तुम्ही हे पैसे (अमेरिकन डॉलर) चॅरिटीमध्ये दान करा. तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमाचा आणि सन्मानाचा मी आदर करतो. अगदी निसंकोचपणे हे डॉलर (पैसे) तुम्ही दान करा,” असा सल्ला त्याने या चाहत्याला दिला. Ayushmann Khurrana |
View this post on Instagram
आयुष्मान खुरानाच्या या व्हिडिओवर कमेंट करत एकाने लिहिले की, ‘लाइव्ह कॉन्सर्टमध्ये असा अनादर घडताना पाहणे निराशाजनक आहे. संगीताचा आनंद घेण्याऐवजी या माणसाने आपली संपत्ती चुकीच्या पद्धतीने दाखवली आहे.’ Ayushmann Khurrana |
आयुषमान खुराणाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, तो ‘ड्रीम गर्ल-2’ चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडेसोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. आयुष्मान पुढे मॅडॉक फिल्म्सच्या आगामी ‘थामा’ मध्ये दिसणार आहे, जो ब्लॉकबस्टर हॉरर-कॉमेडी विश्वाचा एक भाग आहे. 2025 च्या दिवाळीत रिलीज होणाऱ्या या सिनेमात भयपट आणि रोमान्सचे मिश्रण पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:





