Amruta Khanvilkar: अभिनेती अमृता खानविलकरचा चाहता वर्ग मोठा आहे. चित्रपटांच्या माध्यमातून अमृताने मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरून देखील ती तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यातच आता अमृताला एका चाहत्याने थेट सोशल मीडियावरूनच लग्नाची मागणी घातली. तिने चाहत्याच्या या कमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच, त्याच्या मागणीवर उत्तर देखील दिले. अमृताने इंस्टाग्रामवर चाहत्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये चाहत्याने अभिनेत्रीला लग्नाची मागणी घालत कमेंटमध्ये लिहिले की, ‘अमृता माझ तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. प्लीज, मी तुझा कायमस्वरुपी नवरा बनायला इच्छूक आहे. मी इंडियन सुनील.’ चाहत्याच्या या मागणीवर अमृताने देखील मजेशीर उत्तर दिले आहे. अमृताने चाहत्याच्या लग्नाच्या प्रस्तावावर उत्तर देताना लिहिले की, ‘हॅलो इंडियन सुनील. मला ही ऑफर दिल्याबद्दल आभारी आहे. पण मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, जरी तुला कायमस्वरुपी नवरा व्हायचे असेल तरी. खरंच सॉरी.’ तिने शेअर केलेला हा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमृताने तिच्या नवीन घरात प्रवेश केला आहे. नववर्षाच्या निमित्ताने तिने नवीन घरात प्रवेश केला. तिने घराला ‘एकम’ असे नाव दिले आहे. गृहप्रवेशाचे व्हीडिओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.