प्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे निधन
Updated On:

लाहोर – प्रसिद्ध पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबी यांचे नुकतेच निधन झाले. कोल्हापूरच्या आखाड्यात कर्तबगारी दाखवलेल्या सादिक यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक नामवंत मल्लांना अस्मान दाखवले होते. कोल्हापूरमधील प्रसिद्ध शाहू विजयी गंगावेस तालमीत त्यांची कारकीर्द बहरली.
1960 च्या दशकात सादिक आपले वडील निका यांच्यासह पाकिस्तानला परतले होते. आयुष्यात पुन्हा संधी मिळाली तर भारतात येऊन कोल्हापूरमध्ये जाऊन रंकाळा तलाव परिसरात फेरफटका मारायला आवडेल, असे काही वर्षांपूर्वी त्यांनी व्यक्त केले होते. त्यांची ही इच्छा मात्र, अपूर्णच राहिली.





