Famous comedian : महाराष्ट्रातील प्रसिद्ध हास्यकलाकाराचं निधन; कलाविश्वावर शोककळा
Famous comedian : आपल्या विनोदी शैलीने, एकपात्री प्रयोगांनी आणि अहिराणी कवितांनी खानदेशातील रसिकांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध हास्यकलाकार विजय दगडू पवार यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Famous comedian : आपल्या विनोदी शैलीने, एकपात्री प्रयोगांनी आणि अहिराणी कवितांनी खानदेशातील रसिकांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध हास्यकलाकार विजय दगडू पवार यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (Famous comedian)
त्यांच्या निधनाने अहिराणी नाट्य, साहित्य आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवताना त्यांनी आपल्या अभिनयातून हजारो रसिकांच्या मनातही विशेष स्थान निर्माण केले होते. (Famous comedian)
शिक्षकाची जबाबदारी सांभाळत जपली कलेची आवड
धुळे जिल्ह्यातील सोनगीर हे विजय पवार यांचे मूळ गाव. नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथील शाळेत ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. कायम विनाअनुदानित तत्त्वावर काम करत असतानाही त्यांनी शिक्षक म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. त्यांच्या निवृत्तीला अवघी दोन वर्षे शिल्लक होती. मात्र, शाळेतील जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी आपल्यातील कलाकारही कायम जिवंत ठेवला. (Famous comedian)
एकपात्री प्रयोग, नाटके आणि अहिराणी साहित्य संमेलनांमध्ये त्यांची उपस्थिती असायची. त्यांच्या विनोदी सादरीकरणाला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असे. त्यांच्या अहिराणी कविता आणि सहजसुंदर शैलीने खानदेशातील रसिकांवर विशेष छाप पाडली होती. त्यांचा चाहतावर्ग केवळ खानदेशापुरता मर्यादित नव्हता, तर विदेशातही त्यांचे चाहते होते. (Famous comedian)
आईच्या प्रेमापोटी आयुष्यभर अनवाणी राहिले
विजय पवार यांची ओळख केवळ विनोदी कलाकार म्हणून नव्हती, तर ते आईवर अपार प्रेम करणारे संवेदनशील पुत्रही होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांना त्यांचा पाय कापावा लागला. आईच्या वेदनांशी भावनिक नाते जोडत विजय पवार यांनी स्वतः चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला. (Famous comedian)
विशेष म्हणजे, आईच्या निधनानंतरही त्यांनी हा संकल्प कायम ठेवला. शेवटच्या श्वासापर्यंत ते अनवाणीच राहिले. त्यांच्या या कृतीतून आईबद्दलचे त्यांचे निस्सीम प्रेम आणि भावनिक नाते दिसून येत होते. (Famous comedian)
‘बटरफ्लाय’ चित्रपटातील भूमिकेचे झाले होते कौतुक
नंदुरबारमधील डॉक्टरांनी तयार केलेल्या ‘बटरफ्लाय’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचेही कौतुक झाले होते. अहिराणी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये काम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची जीवनयात्रा थांबली. (Famous comedian)
निवृत्तीनंतर सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके आणि ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून रसिकांशी जोडलेले राहण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, हा नवा प्रवास सुरू होण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. आज पहाटे चारच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. (Famous comedian)
विनोदातून रसिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा, कलेवर मनापासून प्रेम करणारा आणि आईवरील प्रेमासाठी आयुष्यभर अनवाणी राहणारा हा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने खानदेशच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. (Famous comedian)





