Accident News: प्रसिद्ध उद्योगपतीचा अपघात; स्पीडबोट उलटल्याने जखमी, मुंबईत उपचार सुरू
Accident News : अपघात झाला त्या बोटीवर सिंघानिया यांच्यासह रॅली ड्रायव्हर हरी सिंग, एक ब्रिटीश आणि एक रशियन नागरिकही होते.

Accident News: प्रसिद्ध उद्योजक आणि रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया (Gautam Singhania ) यांचा मालदीवमध्ये अपघात झाला आहे. मालदीवमधील फेलिधूजवळ गुरुवारी रात्री सुमारे 11 वाजता त्यांची स्पीडबोट समुद्रात पलटली.
या अपघातात सिंघानिया जखमी झाले असून त्यांना तातडीने एअरलिफ्ट करून मुंबईत आणण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Accident News
या बोटीत सिंघानिया यांच्यासह ७ पर्यटक होते, ज्यात ५ भारतीयांचा समावेश होता. त्यापैकी एक भारतीय नागरिकासह दोन जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बचावकार्य सुरू असून त्यांचा शोध घेतला जात आहे. Accident News
Fasting Weight Loss: व्रत ठेवल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य आणि गैरसमज
मिळालेल्या माहितीनुसार, सिंघानिया सुट्ट्यांसाठी मालदीवमध्ये गेले होते. अपघात झाला त्या बोटीवर त्यांच्यासह रॅली ड्रायव्हर हरी सिंग, एक ब्रिटीश आणि एक रशियन नागरिकही होते.
सुदैवाने, सिंघानिया यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने रेस्क्यू करण्यात आले. सध्या त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. Accident News
एडव्हेंचर स्पोर्ट्सची आवड असणारे सिंघानिया स्वतः एक प्रोफेशनल रेसर आहेत. गौतम सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 11 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. Accident News
रेमंड ग्रुपचा व्यवसाय कपडे, डेनिम, कन्झ्युमर केअर, इंजिनिअरिंग आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. कपड्यांच्या बाजारात रेमंडचे अव्वल स्थान आहे.
तसेच डेनिम क्षेत्रातही ही कंपनी अग्रगण्य उत्पादकांपैकी एक असून उच्च दर्जाचे डेनिम उत्पादनासाठी ती ओळखली जाते. Accident News
हेही वाचा :






