Zareen Khan : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; आई परवीन खान यांचं निधन
Zareen Khan : बॅालिवूड अभिनेत्री झरीन खान हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या आईचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

Zareen Khan : बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री झरीन खान आणि सना खान यांच्या आई परवीन खान यांचे बुधवारी मुंबईत दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या निधनामुळे खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना नेमके काय झाले होते याबद्दल माहिती समोर आलेली नाही.
झरीन खानच्या टीमने या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका निवेदनाद्वारे ही दुःखद बातमी दिली.
झरीन खानच्या टीमने एका निवेदनात म्हटले आहे की, “तुम्हाला कळविण्यात येते की, आमच्या प्रिय मिस परवीन खान, झरीन खान आणि सना खान यांच्या आई यांचे 8 एप्रिल रोजी निधन झाले.”
अभिनेत्री झरीन खान गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर आपल्या आईच्या तब्येतीबद्दल नियमितपणे माहिती देत होती आणि चाहत्यांना त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करत होती. मात्र, परवीन खान यांची प्राणज्योत मालवली आहे.
झरीन खानची अभिनय कारकीर्द Zareen Khan
अभिनेत्री झरीन खानने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘फिर से रीस्टार्ट’ या लघुपटातून केली. त्यानंतर तिने 2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘वीर’ या सिनेमातून सलमान खानसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या सिनेमानंतर ती आणखी मोठ्या सिनेमांमध्ये दिसेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही.

Zareen Khan : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; आई परवीन खान यांचं निधन
त्यानंतर झरीन खानने काही सिनेमात काम केले. पण तिच्या बोल्ड सीन्समुळे तिच्यावर टीका करण्यात आली. ती ‘हाऊसफुल 2’, ‘अक्सर 2’ आणि ‘हेट स्टोरी 3’ यांसारख्या बॉलिवूड सिनेमात दिसली. झरीन खान शेवटची 2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ या सिनेमात दिसली होती.





