कौटुंबिक कलहाचा थरार! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह सासू-मेहुण्यावर चाकूने हल्ला, जावयाला अटक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासू आणि मेहुण्यावर चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी जावयाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री विद्यानगर, चिंचवड येथे घडली.आशिष राजु कांबळे (वय 24, रा. शंकर नगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्या सासूने गुरुवारी (दि. १६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष काबळे याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला दमदाटी करत बेदम मारहाण केली. त्याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. जखमी विवाहितेला वाचवण्यासाठी तिची आणि आणि भाऊ आले असता आरोपी आशिष याने त्या दोघांवर देखील चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. हे भांडण सुरु असताना आजूबाजूचे लोक जमा झाले. आशिष याने ‘मी या एरियाचा भाई आहे. कोणी मध्ये आले तर त्याला ठार मारेन’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.




