Family Court Pune : मुलांच्या शिक्षणासह घरखर्चाची जबाबदारी दोघांची; कौटुंबिक न्यायालयाचे आदेश
दोन्ही मुलांच्या अर्ध्या शिक्षण खर्चाबरोबरच अर्धा घरखर्च करण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शाम रुक्मे यांनी दिला आहे.

Family Court Pune – मुलांच्या शिक्षणासह घरखर्चाची जबाबदारी पती-पत्नीची आहे. दोन्ही मुलांच्या अर्ध्या शिक्षण खर्चाबरोबरच अर्धा घरखर्च करण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शाम रुक्मे यांनी दिला आहे. यामध्ये पतीच्या वतीने ॲड.अर्जून व्हजगे यांनी काम पाहिले.
या प्रकरणात पती-पत्नी एकाच घरात राहत आहेत. दोघांना १७ वर्षाचा मुलगा, १५ वर्षाची मुलगी आहे. पत्नीने क्रुरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. त्यानंतर तिने पोटगीसाठीही अर्ज केला होता. दोघे एका घरात राहत आहेत.
पत्नीचे एम.ए.बी.एड. शिक्षण झाले आहे. ती सध्या पीएच. डी करत आहे. उत्पन्नाचे साधन नाही. तिचा दरमहा खर्च ६५ हजार रुपये आहे. पतीचा डिप्लोमा झाला आहे. त्याला दरमहा ९० हजार रुपये पगार आहे. त्यामुळे पत्नीने दैनदिन उपजिविका आणि शैक्षणिक खर्च देण्याचे मागणी केली.
त्यास पतीच्या वतीने ॲड.अर्जून व्हजगे यांनी विरोध करण्यात आला. पत्नी मुलांच्या खर्चाची जबाबदारी उचलत नाही. तिची शैक्षणिक गुणवत्ता पतीपेक्षा जास्त आहे. तिने लग्नानंतर सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी केली आहे.
ती सध्या पीएच.डी करत आहे. दोघांचा २२ वर्षाचा संसार आहे. अनेक संगणकाचे कोर्स केले आहेत. पतीच्या सहकार्याशिवाय शक्य नसल्याचे त्याचे म्हणणे होते. त्यानुसार पत्नीला उत्पन्न आहे, हा पतीचा बचावाचा मुद्दा मान्य करत न्यायालयाने वरील आदेश दिला.





