मोफत केस लढण्याचा दावा खोटा ? सदावर्तेंनी पावणे दोन कोटी घेतल्याचा कर्मचाऱ्यांचा जबाब

Updated On:

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. आजच्या युक्तीवादावर सरकारी वकील प्रदीप घरत यांची प्रतिक्रिया आली असून सदावर्ते यांनी केस लढविण्यासाठी दीड कोटी रुपये जमविल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ऍड. घरत म्हणाले की, पोलिसांनी आरोपी सदावर्तेंचे सीडीआर तपासले. यात बरीच माहिती मिळाली आहे. तसेच आंदोलक कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यामध्ये सदावर्ते यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 550 रुपये जमा केल्याचं समोर आलं आहे. तर सदावर्तेंचं म्हणणे आहे की, मी कर्मचाऱ्याकडून फिस देखील घेतली नाही. मात्र पोलिसांनुसार सदावर्ते यांनी एकूण एक कोटी 80 लाख रुपये जमा केले आहेत. आता पोलिस याचा शोध घेतायत की, हे पैसे कुठं गेले.

पोलिसांना मिळालेल्या सीडीआरनुसार सदावर्तेंना नागपूरहून फोन आणि एक मॅसेज आला होता. त्यात पत्रकारांना पाठवा असं सांगण्यात आलं होतं. फोन आणि मॅसेज करणारा ती व्यक्ती कोण याचा शोध पोलीस घेत असल्याचं ऍड. घऱत यांनी सांगितलं.

आणखी संबंधित बातम्या

सिसोदियांची 52 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचा ईडी मार्फत खोटा दावा

2023-07-08 14:37:14

सिसोदियांची 52 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचा ईडी मार्फत खोटा दावा

Breaking: सदावर्तेंना दिलासा नाहीच; आता 14 दिवसांच्या न्‍यायालयीन कोठडीत रवानगी

2022-04-13 16:59:19

Breaking: सदावर्तेंना दिलासा नाहीच; आता 14 दिवसांच्या न्‍यायालयीन कोठडीत रवानगी

शरद पवारांच्या घरावर हल्ला; ऍड. सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

2022-04-08 19:04:47

शरद पवारांच्या घरावर हल्ला; ऍड. सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सिल्व्हर ओकवर हल्ला करण्यास सदावर्तेंनीच कर्मचाऱ्यांना भडकवल; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

2022-04-08 16:53:17

सिल्व्हर ओकवर हल्ला करण्यास सदावर्तेंनीच कर्मचाऱ्यांना भडकवल; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप