Tamil Nadu : मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा दावा, म्हणाले “भाजप विरोधात मी समस्त विरोधकांना ऐक्‍याची हाक दिल्यानंतर जाणीवपुर्वक…”

Updated On:

चेन्नई, – आपण भाजपला केंद्रातून सत्तेवरून घालवण्यासाठी समस्त विरोधकांना एक येण्याची हाक दिल्यानेच आमच्या सरकारविषयी जाणिवपुर्वक अफवा पसरवल्या जात आहेस असा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की तामिळनाडुत परप्रांतीय मजुरांवर हल्ले केले जात असल्याचा आरोप म्हणजे अशीच एक अफवा होती असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी असे प्रतिपादन केले की राज्यातील कोणत्याही स्थलांतरित कामगारावर हल्ला झालेला नाही. असे अनेक परप्रांतीय कामगार तामिळनाडूमध्ये दीर्घकाळापासून कार्यरत आहेत आणि त्यांना कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही, असे ते म्हणाले.

काही खोटे व्हिडिओ तयार करून आमच्या सरकार विषयी आणि खोटे समज पसरवले जात आहेत. उत्तर भारतातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपप्रचाराचा एक अजेंडा तयार करून हे केले आहे. तुम्हाला असे करण्यामागील षडयंत्र समजेल, असेही ते जनतेला उद्देशून म्हणाले. मी जर भाजपच्या विरोधात अशा ऐक्‍याची हाक दिली नसती तर अशा अफवा पसरवल्या गेल्या नसत्या असेही स्टॅलिन म्हणाले.

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत 1 मार्च रोजी स्टॅलिन यांच्या वाढदिवसाचा मेळावा घेण्यात आला होता. त्या मेळाव्यात स्टॅलिन यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी एकजुटीवर भर दिला होता. त्यानंतरच तामिळनाडुबाबत अशा खोट्या बातम्या प्रसारीत करण्यात आल्या आहेत. या बातम्या आल्यानंतर आम्ही त्याची रितसर चौकशी करून माहिती घेतली. त्यावेळी अशा हल्ल्यांचा प्रकार कोठेही झालेला नाही असे लक्षात आले आहे असे ते म्हणाले.

Land-for-job scam : लालूंच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी; मुलगा तेजस्वी यादव तसेच तीन मुली….

मी स्वता या संबंधात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी बोललो आहे. बिहारच्या लोकांना तामिळनाडुत हल्ल्यांना सामोरे जावे लागल्याचे सांगितले जात होते. याच्या माहिती साठी बिहारचे एक शिष्टमंडळही तामिळनाडुला आले होते. या शिष्टमंडळापुढे सर्व शंका निरसन करण्यात आल्यानंतर हे शिष्टमंडळ समाधानाने बिहार मध्ये परतले आहे असेही स्टॅलिन यांनी नमूद केले.

आणखी संबंधित बातम्या

Thalapathy Vijay: थलपथी विजयने विधानसभेत स्टॅलिन यांची केली नक्कल ; डीएमकेने केले वॉकआऊट ; व्हिडिओ व्हायरल

2026-06-23 14:44:15

Thalapathy Vijay: थलपथी विजयने विधानसभेत स्टॅलिन यांची केली नक्कल ; डीएमकेने केले वॉकआऊट ; व्हिडिओ व्हायरल

MK Stalin: "TVK ही भाजपचीच 'झेरॉक्स कॉपी'..." ; माजी मुख्यमंत्री स्टॅलिन थलपथी विजय यांच्यावर का संतापले ?

2026-06-14 11:45:45

MK Stalin: "TVK ही भाजपचीच 'झेरॉक्स कॉपी'..." ; माजी मुख्यमंत्री स्टॅलिन थलपथी विजय यांच्यावर का संतापले ?

Rajinikanth : "स्टालिन यांचा झालेला पराभव पाहून मला अस्वस्थ वाटले" - रजनीकांत

2026-05-17 17:17:58

Rajinikanth : "स्टालिन यांचा झालेला पराभव पाहून मला अस्वस्थ वाटले" - रजनीकांत

Assembly Election Results: मोठा राजकीय भूकंप! स्वतःच्या बालेकिल्ल्यात थेट मुख्यमंत्र्यांचाच झाला पराभव

2026-05-04 16:23:22

Assembly Election Results: मोठा राजकीय भूकंप! स्वतःच्या बालेकिल्ल्यात थेट मुख्यमंत्र्यांचाच झाला पराभव

Factory fire news : फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव..! 16 कामगारांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले

2026-04-19 19:13:36

Factory fire news : फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव..! 16 कामगारांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले