नवी दिल्ली – नोकरीच्या बदल्यात जमीन भ्रष्टाचार प्रकरणी माजी रेल्वे मंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यांच्या तीन मुली व मुलांच्या घरांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी छापेमारी केली. तसेच लालू यांच्या निकटवर्तीयांच्या घरीही ईडी पोहोचली आहे. दिल्ली, मुंबई, नोएडा आणि पाटणा अशा 15 ठिकाणी ईडीने छापे मारले आहेत.
लालू यांचा मुलगा तेजस्वी यादव तसेच हेमा, रागिनी आणि चंदा या तीन मुलींच्या दिल्ली येथील घरी ईडीने कारवाई केली. तसेच लालू यांच्या राष्ट्रीय जनता दलचे (राजद) माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरावरही ईडीने छापा मारला आहे. दोजाना हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दोजाना यांच्याकडे ज्ञात उप्तन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात ईडीने त्यांच्या घरावर छापा मारला आहे.
लालू प्रसाद यांचे व्याही जितेंद्र यादव यांच्या गाजियाबाद येथील घरावरही ईडीने छापा मारला आहे. सकाळी 8 वाजताच ईडीचे सात ते आठ अधिकारी जितेंद्र यादव यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अजून तीन अधिकारी जितेंद्र यादव यांच्या घरी दाखल झाले.
Delhi excise policy case : ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेऊन त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या…
घराचे दररवाजे बंद करुन ईडी कारवाई करत होती. जितेंद्र यादव हे समाजवादी पार्टीचे माजी आमदार आहेत. ते गाजियाबाद येथील आरडीसी राजनगर विभागात राहतात.